Signed in as:
filler@godaddy.com
#हळद काढली आता पुढे काय??
नमस्कार,
जानेवारी महिना सुरु झाला की सहसा ग्रुप वर, बऱ्याच मेंबर्स कडून काढलेल्या हळदीचे फोटो Share करायला सुरु होतात. सहसा जानेवारी ते मार्च या काळात हळद काढणी सुरु असते .हळदीच्या लावलेल्या जातीनुसार हळद लावल्यापासून साधारणत: 8-9 महिन्यांच्या कष्टानंतर हा योग येतो .
ह्या काढलेल्या हळदीचे काय करायचे हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो. लोणचं बनवायचं??का पावडर बनवायची?? की पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी ठेवायचं.खरं तर ह्या वरील प्रश्नातच सगळी उत्तरं आली.
लोणच्याच्या बऱ्याच रेसिपी Youtube वर आहेत माझं सगळ्यात फेव्हरेट म्हणजे आलं, लिंबू आणि खिसलेली कच्ची हळद, अप्रतिम लोणचं बनतं.
पावडर कशी बनवावी?
खरं तर आम्ही शेतातून काढलेल्या हळदीची मोठ्या प्रमाणावर पावडर बनवण्याची प्रक्रिया जरा क्लीष्टच आहे.
हळद धुवायची, उकडून घ्यायची, त्याला 45 दिवस वाळवयाची, त्याला ढोल करायची, डबल पॉलिश करून हळकुंड तयार करायचे मग त्याची पावडर बनवायची
घरच्या घरी छोट्या प्रमाणावर हळद पावडर बनवण्याचे 2 ऑपशन्स आहेत.
ऑप्शन 1 ( न उकडता)
ओल्या हळदीपासून पावडर बनवण्यासाठी
काढलेली हळद 2 दिवस वर ठेवावी
काढलेले कंद स्वच्छ धुवून घ्यायचे.
त्याची साल सोलपटण्याने काढायची ( हळद धम्मक पिवळ्या रंगाची हवी असेल तर साल काढावी, सालीसकट Slice केल्यास काळपट रंग येतो )
बटाट्याचे चिप्स जसे बनवतो तसें चिप्स बनवून 3-4 दिवस कडक उन्हात वाळू द्यावे.
त्यानंतर मिक्सर मधून काढून पावडर बनवावी
ऑप्शन 2 (उकडून )
काढलेली ओली हळद दोन दिवस सावलीत ठेवावी.
- हळदीची माती काढून कंद पाण्याने पूर्ण स्वच्छ धुवून घ्यावेत.
- कुकरमध्ये हळद कंद तीन शिट्या देऊन चांगले उकडून घ्यावेत.
- थंड झाल्यावर वरची साले काढून कंद Slice करून घ्यावेत
त्यामुळे त्याचा सरफे्स एरिया कमी होऊन लवकर वाळण्यास मदत होते
Slice केलेले कंद कडक उन्हात चार दिवस वाळवावे.
हे चांगले वाळलेले हळदीचे Slice मिक्सर मध्ये टाकून त्याची बारीक पावडर तयार करावी.
ऑप्शन 3 ( उकडून हळकुंड बनवून )
घरच्या घरी हळकुंड बनवून त्यापासून पावडर बनवणे व्यवहारिक नाहीये. तसें करायचे असल्यास शिजवलेले कंद 40-45 दिवस कडक उन्हात वाळवावे त्यानंतर एका तारेच्या ब्रश ने वाळलेले हळकुंड घासून घ्यावे आणि त्याचा वरचा छोटा काळपट लेयर निघाल्यावर मिक्सर मधून काढावी.
Note -कस्तुरी हळद / आंबे हळद / काळी हळद न उकडता Slice करून घ्याव्या. उकडल्यास त्यांचा विशिष्ट अरोमा रंग आणि औषधी गुणधर्म यात फरक पडू शकतो
तिसरा आणि महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो तो म्हणजे काढलेली हळद परत लावू शकतो का??
हो काढलेली हळद नक्कीच परत लावू शकतो. त्यासाठी काढलेल्या हळदीतून मोठे हेल्दी कंद निवडावेत. मातृकंद आणि फिंगर दोन्हीही.
हे कंद लगेच मातीत रुजावले तर रुजणार नाहीत हळदीची सुप्त अवस्था 45-60 दिवस असते. त्यानंतर या कंदना कोंब यायला लागतात.
त्यामुळे काढलेले कंद सावलीत जिथे ऊन/ वारा लागून वाळणार नाहीत paus/ पाणी लागून खराब होणार नाही अशा ठिकाणी ठेवावेत. शक्यतो बारदानाच्या पोत्यात सावलीत ठेवावेत.
कंदना मोड आल्यावर तुम्ही ते जमिनीत लावू शकता..
आपण काढलेल्या हळदीचे काय काय करू शकतो हे थोडक्यात समजून घेतले अधिक समजण्यासाठी फोटो attach केले आहेत.
Harshada Paralikar Deshmukh -8329215301
हळदीचे प्रकार...
खरं तर हळदीचे जगातील एकूण उत्पनाच्या 80% उत्पादन भारतात होते पण तरीही पिवळी हळद सोडली तर बाकीच्या हळदीनबाबत जास्त माहिती सर्व सामान्य लोकांना नाहीये.
आम्ही पिढ्याणपिढ्या हळदीची शेती करतो. आपल्या ग्रुप मधील बऱ्याच जणांना हळदीचे कंद पुरवले आहेत
मागच्या 3 वर्षांपासून पिवळ्या हळदीसोबत इतरही प्रकारच्या हळदीचे उत्पन्न शेतात घ्यायला सुरवात केली. सुरवातीला अगदी नागालँड केरळ वरून काही Variety मागवल्या.आता कुठे त्या Variety रूळत आहेत.
तश्या तर हळदीच्या 133 प्रकार उप प्रकार आहेत Curcuma फॅमिली मध्ये.
मुख्यतवे व्यापारी दृष्टिकोनातून हळदीचे 6/7 प्रकार आहेत जे भारतात उत्पादन घेतले जाते
पिवळी हळद - ( Curcuma Longa )
ही हळद सर्वसाधारणपणे खाण्यासाठी वापरतात यात सुद्धा उपजाती आहेत, जसे की सेलम, प्रगती, राजापुरी, वायगाव, चेन्ना सेलम लकडोंग इत्यादी
Lakdong आणि ACC 48 ह्या High Curcumin प्रजाती आहेतह्यात Curcumin चे प्रमाण 5% च्या वर आढळले आहे
कस्तुरी हळद - (Curcuma Aromatica)
मुख्यत्वे ही हळद सौन्दर्य प्रसाद्धा्नांमध्ये वापरतात. टँनिंग, सुरकुत्या, Acne ह्या वर उपाय म्हणून हळदीच्या पावडर चा लेप करून लावतात. हळदीची पणे नॉर्मल पिवळ्या हळदीसारखी असतात.8-9 महिन्यात ही हळद काढायला येते.
ही हळद आतून क्रीमिश White कलर ची असते
आंबा हळद (Curcuma Amada )
ही हळद आतून पांढरी असते. याची खासियत म्हणजे या जातीची रोगप्रतिकारक शक्ती खूप असते त्यामुळे उत्पन्न देखील भरघोस येते.
आंबे हळद औषधी असून त्याचा उपयोग सांधेदुखी, शुगर कंट्रोल मासिक पाळी नियमित करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी होतो.
काळी हळद / निळी हळद ( Curcuma Caecia )
कच्ची असताना आतून निळी वळल्यावर काळसर अतिशय दुर्मिळ आणि औषधी हळद.
उग्र काप्रसारखा सुवास, अस्थामा कॅन्सर बद्धकोष्ट्टता अशा दुर्धर आजारावर काळी हळद प्रभावी ठरत आहे
काळ्या हळदीची वैशिष्ट्य म्हणजे याच्या पानावर असणारी काळी रेष त्यामुळे पानावरून ओळखता येणारी तशी ही एकमेव हळद.
बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.सगळ्या प्रकारच्या हळदी कश्या दिसतात यासाठी फोटो पण अपलोड केला आहे
तरीही काही शंका असल्यास नक्की संपर्क करू शकता
संपर्क -8329215301
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.